आंतरराष्ट्रीय व्यापार करार

भारत-ब्रिटन व्यापार करार लागू

करार भारत आणि ब्रिटनदरम्यानचा सर्वसमावेशक वित्तीय आणि व्यापार करार (CETA - Comprehensive Economic and Trade Agreement) तसेच सामाजिक सुरक्षा करार लागू.
अंमलबजावणी कराराची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली.
स्वाक्षरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्वाक्षरी केली होती.
निर्यात प्रारंभ कार्यक्रम केंद्र सरकारने निझामाबाद, हैदराबाद, जयपूर आणि अहमदाबाद येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले.

करारातील प्रमुख तरतुदी व फायदे

शुल्कमुक्ती (Zero Duty)

भारतातून ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या जवळपास ९९% उत्पादनांवरील आयात शुल्क शून्य होणार आहे.

फायदा होणारे भारतीय उद्योग

वस्त्र व तयार कपडे, चामडे व पादत्राणे, आणि रत्ने व दागिने (कामगारकेंद्रित उद्योग).

ब्रिटिश उत्पादनांवर आयात शुल्क कपात

व्यापार उद्दिष्ट

सध्याचा ६० अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार लवकरच १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवरील अंदाज

२०३० पर्यंत अंदाज

द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन ४८ अब्ज पौंड होण्याचा अंदाज.

GDP मध्ये वाढ

दीर्घकाळात ब्रिटनच्या GDP मध्ये दरवर्षी जवळपास ५ अब्ज पौंडांची वाढ अपेक्षित.

इतर फायदे

वित्तीय आणि व्यावसायिक सेवांमध्ये नवीन संधी, गुंतवणूक आणि विस्तारासाठी सुलभता.